Posts

लेख २

 *बदकांच्या कळपातला राजहंस : सुरेश भट* *एका तळ्यात होती बदके पिले सुरेख* सर्वांना ठावूक आहे हे सुप्रसिद्ध गाणं . गदिमांच्या या एका गीताने प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं . अगदी साधा शब्दार्थ घेतला तरी जाणवतं , की पाण्यात बदकापेक्षा वेगळ्या पद्धतीने पोहणाऱ्या त्या पिल्लाला कुणी आपल्यात घेतही नव्हतं खेळायला . खरं तर त्याचं चालणं , पोहणं सारंच डौलदार होतं . तरीही सारेच लोक त्याच्याकडे बोट दाखवून त्याला वेडं म्हणत. कारण ते पिल्लू वेगळं होतं . कुबड्यांच्या राज्यात बांधेसूद माणूसही कुरूप ठरतो म्हणतात असंच काहीसं . अर्थातच त्याचं त्या पिल्लाला दुःख होई. कुणाशी बोलणार ते? त्यालाच चोची मारणं, धाक दाखवणं व्हायचं. त्यालाही वाटून जायचं की खरंच आपण वेडं तर नाही ना?. पण एक दिवस वेगळा उगवला . आरशा सारख्या स्वच्छ पाण्यात त्यानं आपलंच रूप चोरून बघितलं . आणि काय आश्चर्य , की त्याचं त्यालाच कळलं की तो , सामान्य नाही , तर असामान्य राजहंस आहे. असं हे गोष्ट स्वरूपातलं काव्य आणि गीत . अनेकांना हा अनुभव येतो . गटबाजी मधे सामान्यांचा जयजयकार होतो , आणि असामान्य व्यक्ती उपेक्षित राहते . त्या असामान्य माण...

लेख क्र .१

मत्प्रिय गझलेस क्षेमालिंगन !! किती काळ लोटला असेल , आपला पत्रव्यवहार झालाच नाही गं ! एक दहा / पंधरा वर्षांपूर्वी पर्यंत आपण खूप बोलायचो लेखनीतून . किती गोडवा होता त्या पत्रात . चिकटवलेलं पाकिट हळूवार उकलायचं . फोडायचं नाही. कारण आतल्या कागदावरचा मजकूर एवढा हळूवार असायचा ,की वाटायचं त्याला इजा होईल . ते सगळं काळाच्या पडद्याआड गेलंय असं वाटतं . पत्रलेखन पण आताशा खूप शुष्क झालंय . मेल वगैरे लवकर पोचतात गं पण गोडवा नाही त्यात . पत्र कसं आधी हुंगायचं . मग बघायचं .नंतर वाचायचं . पुन्हा पुन्हा त्याची पारायणं करायची . आणि छानशा पेटीत ठेवायचं . कधीतरी वाचण्यासाठी ! नंतर तितकंच छान त्याचं उत्तर लिहायचं . सारंच गोड . हवंहवंस ! आजकाल . . . सोड ते! सखी , तुझीमाझी खरी भेट झाली त्याला आता ४४ वर्ष तरी झालीत. लिहित होते मी ,पण ती कविता म्हणूनच . पण १९७९ साली दादा भेटले , त्यांचं "रंग माझा वेगळा " वाचलं आणि तुझ्या आणखीच प्रेमात पडले . त्यावेळी खूप मित्र मैत्रिणी होते गं तसे . कथा , कादंबरी , ललीत , स्फुट , संकीर्ण , प्रवासवर्णन , प्रासंगिक , इतरही अनेक जण आणि कविता ! कवितांचे प्रकार तर कितीतरी...